समजून घेऊया .. मुलं स्वतःच्या अनुभव विश्वातून शिकत असतात.घरातील आई,वडील,भाऊ,बहीण,शेजारी,नातेवाईक,तसेच परिसरातील निरिक्षणातून मुलं शिकत असते. मुलं शाळेत येण्या आधीच हजारो परिचित शब्द संपत्ती त्यांना माहीत असतात.मुलांना निरीक्षण आणि अनुमान हे गुण जन्मजात असतात.त्या गुणांच्या आधारे मुले परिसरातील ज्ञान घेत असतात.आणि तेच त्यांचे प्राथमिक ज्ञान असते. शाळेत किंवा घरी त्यांना या ज्ञानावर आधारित माहिती किंवा सहकार्य जर मिळाले तर मुले पटकन शिकतात.म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी सहज उत्सुक असतात.पण त्याचा अपरिचित माहिती आपण त्यांना देऊ लागलो की मुले लक्ष देत नाहीत. तेव्हा मुलांची ही शिकण्याची मानसिक पायरी म्हणजे जुन्या ज्ञानावर नवीन ज्ञानाची रचना करत करत शिकणे म्हणजे ज्ञान रचानवाद .मला वाटते आपणही याच पद्धतीने लहान असताना अनेक नव नवीन गोष्टी शिकलो असणार.जसे पोहणे,सायकल चालवणे,झाडावर चढने,घरातील अनेक व्यवसाय,स्वयंपाक,वेगवेगळे पदार्थ,शेती,असे अनेक गोष्टी आपण फक्तं आणि फक्तं निरीक्षण आणि अनुमान यातून शिकलो आहोत.कोणीही हे शिक्षण घेण्यासाठी शाळेत प्रवेश घेतला न्हवता.आणि शाळेत हे शिक्षण द...