विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

ज्ञानरचनावाद


ज्ञानरचनावाद 

या पद्धती नुसार आपण मुलांना शिक्षण कसे देऊ शकतो? कारण बऱ्याच प्रमाणात सर्वांचा असा समज आहे की शिक्षक,पालकांनी काहीही मुलांना शिकवायचे नाही.मुलांना त्यांच्या आवडीने शिकू द्यावे.त्यामुळे परिणाम असा होतो की शिक्षक,पालक तटस्थ राहतात.

त्यामुळे ही पद्धती समजून घेणे गरजेचे आहे. मुलांना शिकण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायचे आहे.म्हणजे एखादा पाठ आपण स्पष्ट करून सांगण्या पेक्षा मुलांकडून त्यातील प्राथमिक माहिती विचारून घेऊ शकतो.

उदाहरणार्थ :

  • पाठातील जोडाक्षरे,जोडशब्द, नाम,सर्वनाम, विरुद्धार्थी शब्द जोडी शोधून लिह.
  • पाठतील चित्राचे वर्णन कर.
  • चित्रात दिसणारे शब्द सांग.
  • चित्र पाहून 5 वाक्य बनव.
  • चित्र पाहून 5 प्रश्न तयार कर.
  • चित्र पाहून काढ आणि त्याला रंग भर.
  • चित्रातली वस्तूंची,रंगांची नावे सांग.
  • पाठाचे वाचन करून तुला आवडलेली 5 वाक्य लिहून ती का आवडली त्याची कारणे ही लिहून काढ.
  • या वरील सर्व प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव दररोज मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे.

असे अनेक प्रश्न निर्माण करून मुलांना कडून त्या पाठाची उजळणी करून घेतली तर तो पाठ शिकण्यास विद्यार्थी फार उत्सुक होतात. यातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो. मुल लक्षपूर्वक ऐकते.आणि त्यांची निरीक्षण शक्ती,अनुमान शक्ती वाढण्यास मदत होते.

आता लक्षात आले असेल तुमच्या की आपण कमीत कमी बोलून,स्पष्टीकरण न देता मुलांना कसे कामाला लावायचे याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल.एकदा हे कौशल्य आत्मसात केले की फार सोप्या पद्धतीने आपण मुलांना मजेदार शिक्षण देऊ शकतो.

या खालील व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. की या शिक्षिका मुलांकडून  कशी तयारी करून घेत आहेत.

https://youtu.be/C12_DwBLNZY


अधिक माहितीसाठी माझा व्हॉट्स ॲप ग्रुप 

Add करू शकता. 👇


Child Education


Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा