ज्ञानरचनावाद - समज गैरसमज मुलं स्वतःच्या अनुभव विश्वासावर ज्ञान घेत राहतात.त्यामुळे मुलांचे शिक्षण घेण्याची आवश्यकता वाढवायची आहे.आता मुल स्वतः शिकतात या संकल्पाने अनेक गैरसमज झाले आहेत.ते कोणते आहेत आणि त्याचे दुष्परिणाम समजून घेऊया. गैरसमज. 1. मुलं स्वतः शिकतात त्यामुळे आपण त्यांना काहीही शिकवायचे नाही.फक्त मुल कशी शिकतात ते पाहत बसायचे. 2.आपण काहीही करायचे नाही फक्त मुलांनाच अभ्यास करायला सांगणे. 3.मुलांकडे कोणताही आग्रह करायचा नाही. 4.पाठांतर करून घेयचे नाही. 5. मुल स्वतः शिकतात हे फक्त म्हणायचे आपल्यालाच सर्व करून घ्यावं लागतं. असे अनेक गैरसमज असतील तर तुम्ही सांगू शकता. समज- 1. आपल्याला शिकवणे बंद करायचे नाही तर शिकवण्याची पद्धत बदलायची आहे. 2. शिकवण्याच्या भूमिकेत आपला रोल कमी आणि मुलांचा रोल जास्त असावा. 3. पाढे,कविता,वाक्य,शब्द पाठांतर करण्या पूर्वी ते तयार कसे होतात ते आधी मुलांना समजले की विद्यार्थ्यांना पाठांतर सोपे जाते. 4. प्रश्न तयार करणे,वाक्य बनवणे,गोष्ट बनवणे,कविता बनवणे,वर्गीकरण करणे,चित्रातली तुलना करणे,अंक तयार करणे,ऐतिहासिक गोष्टीचे वर्णन करणे, परिसराती...