विचार करा.
सायकल विशेष.
- Get link
- X
- Other Apps
*जाणून घेऊया, सायकलविषयी
सहसा माहित नसलेल्या गोष्टी*
🚴♂️🚴♀️🚴♂️🚴♀️🚴♂️🚴♀️🚴♂️🚴♀️🚴♂️🚴♀️
*आज जागतिक सायकल दिवस. 2018 पासून हा दिवस दरवर्षी 3 जूनला साजरा केला जातो. गेल्या दोनशे वर्षांपासून सायकल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.*
*शरीरस्वास्थ्यासह प्रदूषण कमी करण्यासाठीही सायकलिंगचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जवळपास अंतरावर जाण्यासाठी वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले जाते. चला तर मग आज सायकलविषयी शक्यतो माहित नसलेल्या गोष्टी पाहुया...*
● *फ्रान्समध्ये सर्वांत पहिली सायकल बनवली होती, मात्र सायकलीचे हे मॉडर्न डिझाईन इंग्लडकडून घेतले आहे.*
● *जगामध्ये सर्वाधिक लांब सायकल 20 मीटरची आहे. या सायकलीवर तब्बल 35 जण बसू शकतात.*
● *अमेरिकेतील जॉन हॉवर्ड हे सर्वाधिक वेगाने चालवणारे सायकलवीर आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम असून सायकलस्वारीने ते दर तासाला 133.75 किमी अंतर पार करतात.*
● *नियमित सायकलिंग केल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार जडत नाहीत. सायकलिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तातील चरबीची पातळी कमी होते.*
● *असे म्हटले जाते की, जर जगात तीन टक्क्यांनी सायकलिंगचे प्रमाण वाढले तर, जगात होणारे अपघात 50 टक्क्यांनी कमी होतील.*
● *एखादी कार मेन्टेन करायला जेवढे पैसे लागतात त्यापैक्षा 20 पटीने कमी पैसा सायकलसाठी लागतो.*
● *एक गाडी पार्क करायला जितकी जागा लागते त्या जागेत तुम्ही 15 सायकल पार्क करू शकता.*
● *सायकलमुळे 238 दशलक्ष इंधनाची बचत होते.*
● *युकेमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक सायकल्स चालवल्या जातात.*
● *न्युयॉर्कमध्ये 10 टक्के कामे सायकलवरून केली जातात.*
● *जगभरामध्ये कारच्या संख्येपेक्षा दुप्पट सायकल वापरल्या जातात.*
● *नियमित सायकलिंग केल्याने स्नायूंची सहनशक्तीही वाढते.*
● *मधुमेह प्रकार 1 आणि 2 अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी सायकलिंग वरदान आहे.*
● *सायकलिंग हे मानवी प्रगती आणि विकासाचे प्रतिक असल्याचे मानले जाते.*
● *सायकलिंगमुळे माणसाच्या चालण्याचा वेग तीनपटीने वाढतो.*
● *नेदरलँडमध्ये पंधरा वर्षांवरील आठपैकी सात लोकांकडे सायकल असतेच.*
● *जगामध्ये वर्षभरात 10 कोटी सायकल बनवल्या जातात.*
● *सध्या जगभरात 100 कोटी सायकल चालवल्या जातात.*
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..