विचार करा.
ज्ञानरचनावाद
- Get link
- X
- Other Apps
जेमतेम 10 वर्ष झाली असतील शिक्षणात ज्ञानरचनावाद ही पद्धती येऊन.पण अजूनही आपण त्याचे महत्त्व आणि उपयोग करू शकलो नाही. कारण ती कृती युक्त अध्ययन अध्यापन पद्धती आहे. यात फक्त बोलायचे नाही,लेक्चर देयचे नाही,माहिती गोळा करण्यासाठी नाही तर या सर्वांसोबत कृती अपेक्षित आहे.
मुलं स्वतःच्या अनुभव विश्वासावर ज्ञान घेत राहतात.आपण फक्त त्यांना दिशा देण्याचे काम करायचे.यात आपल्या सर्वांना फार कौशल्य आत्मसात करावे लागतात.
जसे
- मुलांसाठी वेळ काढणं.
- त्यांना motivate होईल असे बोलणे.
- त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीला Appreciation करणे.
- आपण त्यांच्या चुका सांगण्या पेक्षा त्यांच्या चुका त्यांनीच शोधल्या जाव्यात.
- आपलं काय बरोबर काय चूक आहे हे मुलांना स्वतः कसे समजेल याचा आपण विचार करायला हवा.
अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आपण जर केला तर ही पद्धत राबवण्यात खुप सोपी आहे.
एक उदाहरण पाहू.
मुलांना सतत काहीतरी उद्योग करण्याची सवय असते.पण आपल्याला मात्र त्याचा खुप त्रास होतो.
राजूला झाडांची पाने तोडून खेळण्याची आवड आहे.तो दररोज दरातील झाडांची पाने तोडून घरात आणतो. खेळून झाल्यावर तो ती पाने घरात इतरत्र कुठेही फेकून देतो.त्यामुळे राजूची आई फार चिडचिड करते.प्रसंगी राजूला मार ही बसतो.त्यामुळे तो अधिक चिडचिड करतो.
आता यात आपण विचार करूया की राजूला एक सवय आहे की झाडांची पाने तोडणे आणि खेळ खेळणे.पण त्याला हे माहीत नाही की त्या पानांचे काय करायचे? जर त्याची आई किंवा बाबा यांनी या उपक्रम बद्दल त्याचे कौतुक केले तर, दुसरे त्याला शांत पाने समजून सांगितले की....
1. तू जी पाने तोडली आहेत त्याचा आपण एक प्रोजेक्ट बनवू. कोऱ्या कागदावर मास्याच्या आकारात पाने चिटकावली तर ...
2. तू एवढी एकाच झाडाची एवढी पाने तोडण्या पेक्षा वेगवेगळ्या झाडाची एक दोन च पाने घेतली तर...
3.या पानाचा वापर करून जर हार ,तोरण बनवलं तर...
4. पानाचे आकार कागदावर काढले तर...
5. एक सारखे आकार असलेले पानांचे वर्गीकरण केले तर...
6. तूच सांग याचे अजून काय काय उपक्रम करता येतील...
7. शिल्लक पाने paper मध्ये ठेऊन वळवले तर ...
खालील व्हिडिओ मध्ये मुलांना आवडणारी गोष्ट म्हणजे माती खेळणे त्या आवडीचा उपयोग करून मुले शिक्षण कसे घेत आहेत.आणि त्याच्या शिक्षिका कसे मार्गदर्शन करत आहेत ते अवश्य पहा समजून घ्या.👇
🏵️ असे अनेक प्रश्न उपस्थित केल्याने मुलांना मजेदार गोष्टी शिकण्याचा आनंद,उत्साह निर्माण होतो.तसेच मुलांचे आणि आपले नाते अधिक विकसित होऊ शकते.
ज्ञानरचनावाद म्हणजे नक्की काय ?
विचारात बदल मानसिकतेत बदल. आणि मुलांना शिकण्याची संधी निर्माण करून देणे.
Change your thinking
Change your children.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..