ज्ञानरचनावाद उपक्रम....
कृतीतून शिक्षण.
मुलांना कृती करायला खुप आवडतात.तसेच कृती करताना मुलांची निरीक्षण शक्ती आणि अनुमान चांगलेच सुधारते. मुले पुर्ण एकाग्र होऊन कृती पुर्ण करतात.
यातील एक सोपा आणि सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांची शब्द संपत्ती वाढवण्यास मदत होईल.हा उपक्रम दररोज घेऊ शकता.
उपक्रमाचे नाव - शब्दचक्र.
फार मजेशीर उपक्रम आहे. फळा,कागद किंवा फारशी या पैकी कशावरही एक लहान वर्तुळ काढून त्या मध्ये कोणतेही एक मुळाक्षरे लिहा. आता हे अक्षर ज्या शब्दात येते असे शब्द आपण मुलांना विचारावे.आपण त्यांना हिंट देऊ शकतो. पण शब्द मात्र मुलांनाच सांगू द्यावे.
मुलांनी जर योग्य शब्द सांगितला तर आपण त्यांचे कौतुक करूया.त्याला आणखी शब्द सांगण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.यात मुले फार उत्साहाने सहभागी होतात.आणि मूळ म्हणजे मुले बोलकी होतात. मुलांचा आत्मविश्वास वाढतो.स्मरणशक्ती वाढते. मुले जिज्ञासू आणि चिकित्सक अभ्यास करतात.
हा उपक्रम आपण दररोज सर्व वर्गातील म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वापरु शकता. तसेच सर्व विषयांची शब्द संपत्ती वाढवण्यास मदत होते.
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण हा उपक्रम दररोज घेऊ शकतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकतो.👇
ज्ञानरचनावाद उपक्रम माझा child Education नावाचा What's app group वर क्लिक करून जॉईन होऊ
शकता.आणि समजून घेऊ शकतो.
👇
Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..