विचार करा.
हिंदू कालगणना वर्ष...
- Get link
- X
- Other Apps
☀️☀️☀️☀️
🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅
🚩 *गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या असतीलच पण खरंच आपल्याला हिंदू वर्षाबद्दल माहीत आहे का ?* 🚩
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
🕉️हिंदू कालगणनेत *दोन प्रमुख कॅलेंडर* मानले जातात .
1) विक्रम संवत 2) शालिवाहन शक
दोन्ही ही कालगणना *चंद्रानुसार* होते. म्हणजे *चांद्र वर्ष .* आज *विक्रम संवत 2078* सुरू होत आहे तर *शालिवाहन शक 1943.*
चंद्रावरून कालगणना *नेपाळ थायलंड चीन यासोबतच अनेक मुस्लिम देशात होते.*
नेपाळमध्ये विक्रम संवत मानले जाते. *आज नेपाळ व थायलंड मध्ये ही नवीन वर्ष साजरा केला जात आहे.*
चंद्र वर्ष हा *354 दिवसांचा* असतो. 12 महिने असतात व महिना 29.5 दिवसांचा असतो. चैत्र हा पहिला महिना तर फाल्गुन/ फागून हा शेवटचा महिना असतो .
काही देशात ( विशेषतः मुस्लिम कॅलेंडर ) मध्ये सौर वर्षाशी समन्वय साधला जात नाही.
मात्र हिंदू कॅलेंडर मध्ये सौर राशींशी याचा समन्वय साधला जातो व दर तीन वर्षांने हे जास्तीचे दिवस समायोजित करून एक *अधिक महिना दिला जातो त्यामुळे मराठी महिना व ऋतू यांचे नाते टिकून राहते.*
काही राज्यात *नवीन महिना पौर्णिमे नंतरच्या प्रतिपदेला तर काही राज्यात अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला नवीन महिना सुरू झाल्याचे मानले जाते* त्यामुळे काही सणांमध्ये उत्तर भारतात 14/15 दिवसांचा फरक पडतो.
प्रत्येक महिन्यात *दोन पक्ष* ( 15 दिवसांचा पक्ष ) असतात . *शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष .* आमवास्येनंतर शुक्ल पक्ष सुरू होतो तर पौर्णिमेनंतर कृष्णपक्ष सुरू होतो. पक्षाच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.
प्रतिपदा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी व पौर्णिमा ह्या शुक्ल पक्षातील तिथी असतात . *कृष्ण पक्षात फक्त 15 वी तिथी पौर्णिमे ऐवजी आमावस्या असते.*
एखादी तिथी लिहताना महिना पक्ष व तिथी असे लिहितात उदा आज
*चैत्र शु"||1 किंवा चैत्र शु प्रतिपदा*
भारतात ग्रेगोरीयन कॅलेंडर ने सर्व व्यवहार होत असले तरी बहुतेक सण हे चांद्र वर्षाने साजरे केले जातात. *बौद्ध धर्माचा मोठा सण बुद्धपौर्णिमा हा सण वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो.*
*विक्रम संवत इ स पूर्व 57* मध्ये सुरू झाले तर *शालिवाहन शक इ स 78 मध्ये सुरू झाले.* त्यापूर्वी शेकडो वर्षे हिंदू कालगणना होती मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे संवत असल्याने ते प्रचलित राहिले नाहीत.
*मुस्लिम वर्ष* हे मुहम्मद पैगंबर यांनी केलेल्या मक्का ते मदिनाच्या स्थलांतर ( हिजरत) दिनापासून सुरू केले गेले ( *इस 622) . आज 1442* वे वर्ष सुरू आहे. *मोहर्रम हा वर्षाचा पहिला महिना* असतो.
तरीही भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत व वेगवेगळ्या दिवसांत नवीन वर्ष मानण्याची प्रथा आहे. उदा . *गुजरात राजस्थान मध्ये दिवाळी नंतरच्या प्रतिपदेला नर्व वर्ष समजले जाते.*
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌺🌸🌺🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..