विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

जीवन ...सुंदर कविता.



 

शीर्षक  : जीवन.


जीवन आहे एक रणांगण,

युद्ध करूया जोमाने.

आयुष्यातील प्रत्येक क्षणांन,

फुलून जाऊ प्रेमाने.


               जन्म ,मृत्यू चे लपंडाव,

               सहज खेळूया लीलेने.

               सुख  दुःखाची ऊन साऊली,

               स्विकार करूया आनंदाने.


 आपल्या जीवन आयुष्यावर,

 कविता व्हावी कवींची.

असेच आपले जगणे व्हावे,

 नाटक व्हावे लेखणींची.


             जीवनाच्या ही पलीकडे,

           डोकावून पाहायला हवं.

        निरपेक्ष आनंदाच्या झऱ्यात,

            डुंबून जाता यायला हवं.


जीवन आहे कशासाठी ?

प्रश्न नेहमी पडलेले.

परंपरेची कास धरुनी,

उत्तर शोधावे पडलेले .


             जगणे इतके सुंदर व्हावे,

          भगवंताने ही येऊन भेटावे.

        जगण्याचे मग सार्थक व्हावे,

         जगणे नव्याने पुन्हा भेटावे........


स्वरचित आहे.......

श्री. प्रफुल्ल जगन्नाथ कामठे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव पुनर्वसन. 

केंद्र - कदमवस्ती.

तालुका  - दौंड.

जिल्हा - पुणे.

9921453978.

Comments

Post a Comment

Thank you very much.
Visit Again..

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा