विचार करा.
बोधकथा. सॉक्रेटीस चे तीन फिल्टर्स.
- Get link
- X
- Other Apps
सॉक्रेटीस चे तीन फिल्टर्स
🎭🌺🌺🌺🏵️🏵️🌺🌺🌺🏵️🏵️🌺🌺🌺🏵️🏵️🌺
सॉक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू म्हणाला, "तुमच्या मित्राबद्दल मी आताच जे काही ऐकले आहे ते तुम्हाला माहीत आहे का ?"
"भल्या माणसा , थोडा वेळ थांब, " सॉक्रेटिसने त्याला थांबवले व म्हटले .
"कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन फिल्टर्समधून गाळून घेतो व नंतर ऐकतो ...!!"
" तीन फिल्टर्स? काय , आहेत तरी काय त्या?"
" हे पहा, माझे पहिले फिल्टर आहे ,माहितीची सत्यता...! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "
"नाही, मी ऐकले आहे." तो माणूस बोलला.
"ठीक आहे " सॉक्रेटिस म्हणाला.
"आता दुसरे फिल्टर . मला असे सांगा की तुम्ही जे ऐकले ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे?"
"खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला.
"म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे, मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ?" सैक्रेटिसने विचारले.
"ठीक आहे.आता आपण तिसरे फिल्टर लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल".
"तिसरे फिल्टर आहे उपयुक्ततेचे...!
तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का?"
"खरे तर नाही !" तो माणूस बोलला.
सॉक्रेटिस म्हणाला,
"हे पहा, जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही,
माझ्या मित्राबद्दल चांगले सांगत नाही,
आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही ,अशी गोष्ट ऐकून मी काय करणार...?
म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका. बाय...!!"
.....आणि सैक्रेटिसने आपले काम चालू केले...!!
🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🏵️🏵️
..........विचार करा ....आणि निर्णय घ्या............Think it..
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..