विचार करा.
स्वयं अध्ययन मराठी
- Get link
- X
- Other Apps
मराठी कृतीपत्रिका..
सूचना - खालील नाट्य छटा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घेणे.
कुठलातरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना (आणि त्याबरोबर इकडच्या-तिकडच्या गप्पा करताना) एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वर्मी बसला. तो घाव 'वर्मी' बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं; पण 'तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं?' म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यांमुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली.सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली, 'मलम मलिए, काम पे चलिए'. मी बोटावर मलम लावले; पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले.
प्रश्न 1. लेखिका आपल्याला कोणती घटना सांगत आहे ?
प्रश्न 2. लोकांनी आश्चर्यानं तोंडात बोटं का घातली ?
प्रश्न 3.लेखिकेला कोणती जाहिरात आठवली ?
प्रश्न 4.उताऱ्यात आलेले सर्व वाक्प्रचार शोधून लिह.
प्रश्न 5. तुमची अशी एखादी घडलेली घटना लिहा.
सूचना - खालील कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घेणे.
बहुमोल जीवन
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
फुले निखळुनी पडती, तरिही झाड सारखे झडते का ?
भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला
गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला
काटे देते म्हणुनी लतिका मातीवरती चिडते का ?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
वसंत येतो, निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला
पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला
देह जळाला म्हणुनी धरणी एकसारखी रडते का ?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
प्रश्न 1- जीवनात कोनासारखी घटना घडत नाहीत ?
प्रश्न 2- गुलाब काय मोडत नाही ?
प्रश्न 3 - कवितेत आलेले यमक जुळणारे शब्द लिही ?
प्रश्न 4 - सृष्टी ग्रीष्म ऋतू नंतर काय नेसते ?
प्रश्न 5 - जीवन बहुमोल आहे असे कवी का सांगत असेल ?
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..