विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

गृहपाठ मराठी....

 

मराठी गृृहपाठ.



📝 कृती 1. खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही: 

चैत्राचा महिना.झाडांना कोवळी पालवी फुटली होती.पाखरांचा किलबिलाट चालला होता.या दिवसात शेतकरी रिकामा असतो.गव्हाचा व हरभ न्या चा हंगाम संपलेला असतो.नांगरटीला अजून अवकाश असतो.शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळत असतो. या महिन्यात वेगवेगळ्या देवतांच्या जत्रा भारतात.

प्रश्न १ झाडांना कोवळी पालवी केव्हा फुटते? 

१] आषाढात 2] चैत्रात 3] श्रावणात ४] वैशाखात


प्रश्न 2 अवकाश या शब्दाचा उतारयातील अर्थ कोणता?

 १] अवधी 2] आकाश 3] सवड ४] रिकामा वेळ 

प्रश्न 3 जसे पैसे- छनछनाट , तसे- पाखरे - ? 

1]झगमगाट 2] चिवचिवाट 3] किलबिलाट ४] खुळखुळाट.

कृती 2. खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही.


डोंगर् गावी वळणवाट ही 

दुडक्या चालीत चढे टेकडी

नसे एकटी ती पहाडी

तिच्या सोबती जंगलझाडी

निथळून जाई मृगासरीनी

 हिरवे लेणे तिला श्रावणी

पिवळ्या माला आश्विन आणी 

डोंगर चढते ही सजुनी 

संध्यासमयी प्रभा निळसर

 तियेच्या मनी दाटे हुरहूर

 लपेटते ती धुक्याचा पदर 

काळोखामध्ये बुडतो डोंगर .

प्रश्न १ दुडक्या चालीमध्ये कोण टेकडी चढत आहे? 

१] पहाड 2] श्रावणी 3] आश्चिन ४] वळणवाट

प्रश्न 2 निळसर प्रभा केव्हा उमटते ? 

१] सकाळी 2] दुपारी 3] सायंकाळी ४] उष:काली 

प्रश्न 3 मृगासरी म्हणजे काय ? 

१] मृगाचा पाऊस 2] हरणांची रांग 3] मृगांचे भिजणे


प्रश्न ४ खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. 

आ) सामान्य नाम व विशेष नाम ओळखून लिही.

 उर्वी हुशार मुलगी आहे.

सामान्यनाम- 

विशेषनाम -

बा) योग्य सर्वनाम ओळख. 

 अभ्यास करेल तो पास होईल. 

१] ज्यांनी 2] त्याने 3 मी ४] जो 

का) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? 

 १] फुले 2] मुले 3] चटई ४] पुस्तक --

डा) खालील वाक्य वर्तमानकाळी करण्यासाठी योग्य पर्याय निवड .

१] लिहिले 2] लिहिते 3] लिहील ४] लिहित होती .

इ ) दिलेला अर्थ होणाऱ्या वाक्प्रचाराचा क्रमांक निवड. 

उपाशी राहणे :-

१] देवाला नवस करणे 

2] थंडा फराळ करणे 

3] अंग चोरणे

४] भिक मागणे.

फा) दिलेल्या म्हणीच्या अर्थाशी जुळणारी पर्यायातील म्हण शोधून योग्य पर्याय निवड .

 कामापुरता मामा :-

१] ताकापुरती आजीबाई

2] दुभत्या गाईच्या लाथा गोड

3] गाण्यापुरता गवई

४] दाम करी काम


---

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा