विचार करा.
सहज सोपे वाचन भाग 3
- Get link
- X
- Other Apps
सहज सोपे वाचन व्हावे या साठी आपण आज एक गोष्ट वाचणार आहोत.गोष्ट वाचूया आणि समजून घेऊया. आटपाट नगर होते.या नगराचा राजा होता "बहादुर".राजाला शिकार करण्याची फार फार आवड. एके दिवशी राजा शिकार करायला गेला.दिवसभर राजा जंगलात फिरला.पण एकही शिकार मिळाली नाही.राजाने फार विचार केला .तेव्हा त्याला असे वाटले की आज सकाळी सकाळी शेतकऱ्याचे तोंड पहिले.म्हणूनच मला आज शिकार मिळाली नाही.राजा रिकाम्या हाताने राज्यात परत आला. त्याने तातडीने राज दरबार बोलावला.राजा म्हणाला;प्रधानजी आताच्या आत्ता त्या शेतकऱ्याला माझ्या समोर हजर करा. सैनिक शेतकऱ्याला दरबारात हजर करतात. राजा म्हणाला,अरे शेतकऱ्या तुझा चेहरा पाहून मी शिकार करायला गेलो आणि मला एक ही शिकार मिळाली नाही.हे केवळ तुझा चेहरा पहिल्या मुळे झाले.त्यामुळे मी तुला फाशीची शिक्षा सुनावत आहे.शेतकरी म्हणाला महाराज माझा चेहरा पहिल्या मुळे तुम्हाला शिकार मिळाली नाही.पण तुमचे तोंड पहिले अन मला फाशीची शिक्षा सुनावली.मग सांगा सर्वात अपशकून चेहरा कोणाचा ? राजा शरमला आणि त्याने शेतकऱ्याला सोडून दिले. या गोष्टी पासून आपण काय शिकलो आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर इतरांना दोष न देता स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे..यातून मुलांना वाचनाची आवड निर्माण होत जाते.....
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..